जिजामाता बालविद्या मंदिर येथे निबंध स्पर्धेचे पारीतोषीक वितरण

0 33

सेलू,दि 30 (प्रतिनिधी)  ः
सेलू येथील राजर्षी छत्रपती शाहू शि. प्र. मंडळ संचलित जिजामाता बालविद्या मंदिर येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.डॉ. अशोकराव जोगदंड यांचा स्मृति दिन व यानिमित्ताने घेण्यात आलेल्या आंतर शालेय निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना बक्षीस वितरण व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री. डी.व्हि.मुळे तर प्रमुख अतिथी म्हणून वालुर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.दत्तात्रय रोकडे , डॉ.अनुराग जोगदंड, संस्थेचे सहसचिव बाबासाहेब चारठाणकर, डॉ .सौ. अभिलाषा जोगदंड उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कै. अशोकराव जोगदंड यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाठक सर यांनी केले. स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती ल.ला.रा. नूतन कन्या प्रशालेची कु.वैष्णवी ज्ञानेश्वर आढे, व्दितीय क्रमांक विवेकानंद प्राथमिक शाळा सेलू येथील कु.होगे संचिता ज्ञानेश्वर तर तृतीय क्रमांक श्री के.बा. प्राथमिक सेलूची सारक्षा प्रशांत जगताप यांनी यश संपादन केले, या स्पर्धेत नूतन विद्यालय, नूतन कन्या, शारदा, श्री के.बा., विवेकानंद, एकलव्य, जिजामाता, यशवंत, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्राथमिक शाळेने सहभाग नोंदवला.
प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख, दत्तात्रय रोकडे, सौ. डॉ.अभिलाषा जोगदंड, श्री विजय चौधरी सर, श्री गाडेकर सर, सौ अमृता नरके मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह रोख बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अध्यक्षीय समारोप करतांना श्री. डी. व्हि. मुळे यांनी कै.अशोकराव जोगदंड यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रम सूत्रसंचलन मंगेश शेळके तर आभार भगवान पावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती विजयमाला काळे , श्री कृष्णकांत खापरखुंटीकर, कटारे विष्णू, , सुनील राठोड , बाळु धनवे, तसेच तुकाराम अंभूरे यांनी परिश्रम घेतले,

error: Content is protected !!