श्री शिवाजी विधी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

0 192

 

परभणी,दि 03 ः
श्री शिवाजी विधी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त प्राचार्य व्ही.पी.माकणीकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी त्यांच्यावर आधारित भित्तिपत्रकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. भित्तीपत्रक तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्रेया गायकवाड, श्रद्धा झंवर, प्राप्ती प्रधान, अस्मिता मोरे, हुमेरा अन्सारी, सायली गोरे आदींचा समावेश होता.या प्रसंगी
महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य मा. श्री चंद्रशेखर नखाते, मा. श्री. गोविंद कदम, मा. श्री मकदुम मोहिउद्दिन, मा. श्री. संतोष बोबडे, मा. ॲड. दिपक देशमुख, मा. ॲड. अशोक शिंदे व मा. श्री. संतोष इंगळे आदींनीं आजच्या दिनाचे औचित्य साधून शुभेच्छा दिल्या.

 

error: Content is protected !!