संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत, पोलिसांची माहिती

0 188

संतोष देशमुख हत्या प्रकरणात (santosh deshmukh murder case) सुरुवातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांचा समावेश होता. तर आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले , कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे हे फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी प्रसिद्धीपत्रक जारी करत फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

 

 

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तसंच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. अशाप्रकारे एकूण तिघांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

 

खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाणार आहे. कारण वाल्मिक कराड आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातील एक महत्वाचा दुवा सीआयडीच्या हाती लागला आहे. आतापर्यंत वाल्मिक कराड पवनचक्की प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा दावा करत होता. पण आता खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या विष्णू चाटेने सीआयडीला माहितीमुळे वाल्मिकच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

वाल्मिक कराड आणि पवनचक्की कंपनीच्या अधिका-यांचं फोनवरून संभाषण झालं होतं, अशी मोठी कबुली चाटेने दिली आहे. सीआयडीने न्यायालयात अहवाल सादर केला आहे. वाल्मिकने विष्णू चाटेच्या फोनवरूनच धमकी दिल्याची तक्रार कंपनीच्या अधिका-यांनी दिली होती. याच बाबत चाटेनं दोघांचं बोलणं झाल्याची कबुली दिली आहे.

 

special Team Beed Police
पो.स्टे.केज (जि.बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2),140(1),126, 118(1),34(4),324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गंभीर व संवेदनशील गुन्हयात मयत सरपंच कै.संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायभसे याचेकडे चौकशी करुन गोपनिय माहितगार नेमुन तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करुन यातील पाहिजे आरोपी नामे 1) सुदर्शन चंद्रभान घुले वय 26 रा.टाकळी ता.केज व 2) सुधिर ज्ञानोबा सांगळे वय 23 रा. टाकळी ता.केज यांना ताब्यात घेवुन गुन्हे अन्वेषण विभाग, बीड चे श्री. अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात देत आहोत.

error: Content is protected !!