दर्पण दिनानिमित्त व्हॉइस ऑफ मीडियाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

0 27

परभणी,दि 06 
परभणीत व्हाईस ऑफ मीडियाच्या सर्व शाखेच्या वतीने व्हॉइस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंग जिल्हा कार्यालयात दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा  मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे,मराठवाडा कार्यकारीणी सदस्य प्रविण चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित  झालेल्या कार्यक्रमात दर्पणकारांच्या कार्यास उजाळा देण्यात आला, जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी प्रास्ताविकात संघटनेची ध्येयधोरणे, आगामी वाटचाल आणि परभणीत उभारण्यात येणाऱ्या पत्रकार गृहनिर्माण सोसायटी याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मदनबापू कोल्हे, दत्तात्रय कराळे, रामेश्वर बद्दर, रमेश नाटकर, दिलीप बोरुळ या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
विभागीय मार्गदर्शक सुरेश जंपनगिरे यांच्यासह जिल्हा कार्यकारणीतील शेख मुबारक,कैलास चव्हाण, बालासाहेब काळे, श्रीकांत देशमुख,विवेक मुंदडा, सुधीर बोर्डे, राजन मंगरूळकर,विजय कुलकर्णी, दिवाकर माने,अमोल लंगर, देवानंद वाकळे,गणेश रेंगे,  सोमनाथ स्वामी, शंकर झटे,दिलीप बनकर,उमेश अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला. यावेळी टाकळी कुंभकर्ण येथील पत्रकार राजकुमार दंडवते यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सुरेश जंपनगिरे,प्रविण चौधरी,रामेश्वर बद्दर यांनी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!