सातत्य ,जिद्द व चिकाटी हेच यशाचे गमक आहेत-यशवंत काळे

0 1

सेलू / प्रतिनिधी – आयुष्यात कोणत्याही गोष्टीत सातत्य ,जिद्द व चिकाटी असेल तरच यशाचे शिखर सहज पादाक्रांत करता येते .हेच या “नितीन चषक” स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येत आहे .असे प्रतिपादन परभणीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी “नितीन चषक ” क्रिकेट स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले .

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील नितीन कला ,क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने आयोजित निमंत्रितांच्या राज्यस्तरीय ” नितीन चषक” क्रिकेट स्पर्धेच्या रोप्य महोत्सवी स्पर्धेचे उदघाटन आज दि १५ जानेवारी रोजी संपन्न झाले .

 

येथील नूतन महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून यशवंत काळे यांची उपस्थिती होती .अध्यक्षपदी मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने हे होते .तर व्यासपीठावर ,श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ संजय रोडगे ,महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन चे सचिव संतोष बोबडे ,माजी नगराध्यक्ष पवन आडळकर,प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी ,डॉ अशोक नाईकनवरे ,ऍड दत्तराव कदम ,नामदेव डख ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे ,नारायणराव भिसे ,मिलिंद सावंत , गटकळ अकॅडमी चे संचालक रामेश्वर गटकळ ,न्यू अरिहांत गॅस एजन्सी चे पारस काला ,दिनकर वाघ ,रवी कुलकर्णी यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक ,पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती .

 

मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले .
या स्पर्धा सन २००० मध्ये माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या संकल्पनेतून मा .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा सुरू करण्यात आल्या व दरवर्षी यामध्ये सुधारणा होत आज या स्पर्धेचे रोप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे .गेल्या २५ वर्षात या स्पर्धेत अनेक नामवंत क्रिकेट पटू येथे खेळून गेले आहेत .कसल्याही प्रकारची प्रवेश फी न आकारता या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व १६ संघाची निवास व भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीने करण्यात येते .हे या स्पर्धेचे रोप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे प्रथम परितोषक २ लाख व चषक व द्वितीय १ लाख व चषक ठेवण्यात आलेले आहे .तसेच शहरातील राहत क्रिकेट क्लब ,सवेरा क्रिकेट क्लब व मॉर्निग वॉक क्रिकेट क्लब या तीन क्रिकेट क्लब ना किट व सेलू पोलुस स्टेशन ला मंडळाच्या वतीने पाच सौरऊर्जेवर चालणारे पाच सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात येत आहेत .अशी माहिती प्रास्ताविकात मंडळाचे सचिव संदीप लहाने यांनी दिली . मैदानाची गरज लक्षात घेऊन संदीप लहाने यांनी त्यांची सात एकर जमीन देण्याची घोषणा यावेळी केली .

 

यावेळी डॉ संजय रोडगे ,जयप्रकाश बिहाणी यांनी देखील मनोगतात या क्रिकेट स्पर्धेच्या सातत्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी बोलतांना संतोष बोबडे म्हणाले की ,स्पर्धा सुरू करण्यापेक्षा सातत्य टिकवणे अत्यंत गरजेचे आहे .व हे अत्यंत अवघड काम माजी आमदार हरिभाऊ लहाने व त्यांच्या टीम ने केल्यामुळेच स्पर्धेचे रोप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे . व यामुळे शहराच्या वैभवात निश्चित भर पडणार आहे .खेळाडूंसाठी व निवड स्पर्धेसाठी मैदानाची खरच खूप मोठी अडचण भासत आहे .परंतु नुकतेच संदीप लहाने यांनी जागा देण्याचे कबूल केले असून त्यावर शासनाचा पुरेसा निधी आणून क्रिकेट असोशिएशन नक्कीच एक अद्यावत क्रीडांगण करील .अशी ग्वाही बोबडे यांनी यावेळी दिली .

 

सर्वांच्या सहकार्याच्या बळावरच या” नितिन चषक ” क्रिकेट स्पर्धेचा रोप्य महोत्सव साजरा होत आहे .यासाठी प्रेक्षकांचे देखील योगदान मोठे आहे .अगदी शांततेत व खेळाडू वृत्तीने या सर्व स्पर्धा पार पडतात .त्यामुळे स्पर्धेच्या रोप्य महोत्सवी वर्षात आम्ही खेळाडू सोबतच प्रेक्षकांना देखील दररोज एक सायकल भेट देणार आहोत .या स्पर्धा निमंत्रितांच्या असून केवळ १६ संघांनाच प्रवेश दिला जातो .त्यामुळे बरेचशे संघ नाराज देखील होतात अशी खंत यावेळी अध्यक्षीय समारोपात मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी व्यक्त केली .

 

या नितीन चषक स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मालिकावीर ठरलेल्या बीडच्या किशोर जगताप यांचा देखील यावेळी आवर्जून निमंत्रित करून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .
या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन बोराडे यांनी केले तर प्रा नागेश कान्हेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रत्यक्ष मैदानावर जाऊन खेळाडूंचे हस्तांदोलन व उदघाटन करण्यात आले .
उदघाटनाचा पहिला सामना परभणी विरुद्ध बीड संघात खेळवण्यात आला

 

सलामी सामना परभणी पीडीसी विरुद्ध आदर्श बीड दरम्यान पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक जिंकून प्रथम परभणी पीडीसी संघा ने‌ 17 षटकात सर्व बाद 136 धावा केल्या. यात अहमद खान 36 धावा,‌ सोहेल श्रीखंडे 58 धावा तर सोहिल जिंतूरकर 12 धावा करत तंबूत परतले.
आदर्श बीड करून भेदक मारा ‌ मोमीन नासेर 04 गडी बाद केले तर जय 03 गडी बाद केले.
बीड संघाने 136 धावाचे लक्ष अवघ्या बाराव्या षटकात 139 धावा करत सहा गडी राखून विजय सलामी दिली.
बीड संघाकडून ऋषिकेश सोनवणे 67 धावा तर ‌ देव नवले यांनी 23 धावा,‌ हर्षद चुकला याने 19 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
परभणी संघाच्या वतीने गोलंदाजी करताना‌ शिवाजी नायक व मोहम्मद युसुफ प्रत्येकी दोन दोन गडी बाद केले

error: Content is protected !!