श्रीसंत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
सेलू (प्रतिनिधी )
येथील श्री संत गोविंद बाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत कार्य कारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष श्री राम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून श्रीबल्लभ लोया , सचिव – चंद्रप्रकाश सांगतानी , सहसचिव म्हणून श्री दिपक शिवाजीराव खराबे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.
बैठकीसाठी जेष्ठ संचालक जयप्रकाशजी बिहाणी , प्राचार्य डॉ.ए.एम.डख , चंद्रकांत कदम, अशोक मंत्री, मुंजाभाऊ भिसे, सुनील बापू डख ,चंद्रशेखर नावाडे , प्रफुल्लकुमार बिनायके, प्रल्हादराव कान्हेकर, नंदकिशोर बहिवाल, एकनाथराव पौळ यांची उपस्थिती होती.
नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्रीराम पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.