जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाची सेलूत पायमल्ली, अजूनही कागदी चहाच्या चहाच्या वापर सुरूच

0 2

सेलू,दि 31  ( नारायण पाटील)
कागदी कपावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दिले असले तरी सेलूत अजूनही हॉटेल मध्ये चहाच्या कागदी कपाचा वापर मोठ्या प्रमावर चालूच आहे .यामुळे एक प्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाची पायमल्लीच होतांना दिसून येत आहे . संबंधित यंत्रणेने याबाबत त्वरित योग्य ती उपाययोजना करावी व कागदी कपाच्या वापरावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे .

पूर्वी सर्व हॉटेल मध्ये चहा साठी काचेचे ग्लास व चिनीमातीच्या कपाचा वापर होत होता .
याला पर्याय म्हणून कागदी कपाची निर्मिती झाली .त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे देखील टेन्शन कमी झाले.व त्यांची ग्लास व कप धुण्याची झंझट कमी झाली .कारण कागदी कपाचा वापर करून ते कचरा कुंडीत जाऊ लागले त्यामुळे सर्वांनाच ते सोयीचे वाटू लागले .परंतु चहाचे कागदी कप बनवतांना त्यामध्ये बिपीए नामक केमिकलचा उपयोग केला जातो .व कपात गरम चहा टाकल्यानंतर कपाच्या आतील मायक्रो प्लॅस्टिकचे कण वितळतात .व ते ग्राहकाच्या पोटात जातात त्यामुळे कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो .
त्यासाठी कॅन्सर सारख्या आजाराला कारणीभूत ठरत असलेल्या अशा चहाच्या कागदी कपावर जिल्ह्यात बंदी चे आदेश निर्गमित करण्यात यावेत .असे निवेदन परभणी येथील जागरूक नागरिक सय्यद रफिक पेडगावकर यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना २३ डिसेंबर २०२४ राजी दिले होते .
व त्यानुसार कागदी कप वापरावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाप्रशासनाने दिले आहेत .परंतु ही कार्यवाही कोण करणार याबाबत संभ्रमावस्था दिसून येत आहे .त्यामुळेच कोणतीच यंत्रणा याबाबत अजूनही शहरात सक्रिय दिसून येत नाही .शहरात मोबाईल वर चहा देणाऱ्यांची संख्या देखील मोठी असून त्यांच्याकडून व हॉटेल मध्ये देखील अजूनही कागदी चहाच्या कपाचा वापर सर्रास सुरू आहे .यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका संभवत आहे .अधिकारी व कर्मचारी देखील याच कागदी कपमधून चहा पितात .त्यामुळे कार्यवाही कोण करणार असा यक्ष प्रश्न उपस्थित होत आहे .
तरी याबाबत शासन स्तरावर त्वरित योग्य ती कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचे तसेच सामाजिक हित लक्षात घेऊन समाजसेवी संघटनांनी देखील या प्रकरणी पुढे येणे जनजागृती होणे गरजेचे आहे

error: Content is protected !!