श्रीसमर्थ वेद विद्यालयाच्या अध्यक्षपदी जयप्रकाशजी बिहाणी उपाध्यक्षपदी सीतारामजी मंत्री तर सचिव पदी संजय लढ्ढा

0 28

 

सेलू / नारायण पाटील – महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान, आळंदी (पुणे) संचालित ढालेगाव (ता.पाथरी जि.परभणी) येथील श्री समर्थ वेद विद्यालयाच्या अध्यक्षपदी सेलू येथील प्रसिद्ध उद्योजक जयप्रकाश बिहाणी, उपाध्यक्षपदी सीताराम मंत्री, सचिवपदी संजय लढ्ढा (मानवत), कोषाध्यक्षपदी सुरेंद्र तोष्णीवाल, तर सहसचिवपदी मनोज मंत्री यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

 

कार्यकारी मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी, २३ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडली. या सभेत आगामी पाच वर्षासाठी नूतन कार्यकारी मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी काम बघितले. जेष्ठ सदस्य ॲड.अशोक सोनी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यकारी मंडळातील अन्य सदस्यांत विष्णूकुमार चिचानी. ॲड.अशोक सोनी, गोविंद अजमेरा, नंदकिशोर कालानी, राजेन्द्र मणियार, बजरंगजी गिल्डा, संगीता तिवारी, प्रा.अशोकजी चिंदूरवार, कल्पना भुतडा, डॉ.राधेश्यामजी सिखवाल यांचा समावेश आहे.

 

वेद शिक्षणाचे निरंतर कार्य…
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनात ढालेगाव येथील श्रीसमर्थ वेद विद्यालय हे मागील ३१ वर्षापासून वेद शिक्षणाचे कार्य निरंतर करीत आहे. चारही वेदांच्या सहा शाखांचे शिक्षण विद्यालयात दिले जाते. सध्या एकूण ८५ विद्यार्थी वेद शिक्षण घेत आहेत. त्यांना सात वेदशास्त्रींचे मार्गदर्शन मिळत आहे. विद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील ‘भारतआत्मा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान उज्जैन शिक्षा मंत्रालय भारत सरकारशी वेदविद्यालय संलग्न आहे. वेद शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांवर भर दिला जातो.

error: Content is protected !!