कर्मचारी असो की पोलीस अधिकारी थेट बडतर्फच करणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
ड्रग्स संदर्भात सरकार झिरो टोलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही. त्याला थेट बडतर्फ केले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला इशारा दिलाय. महाराष्ट्र पोलीस परिषद शनिवारी झाली, त्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पोलिसांना इशारा दिला.
बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, नवीन तिन्ही कायद्यांचे अंमलबजावणी सादरीकरण ,सायबर प्लॅटफॉर्म सादरीकरण,महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोप पत्र कसे जलद गतीने न्यायालयासमोर जाईल यावर चर्चा ,ड्रग संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महिला अत्याचार संदर्भात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे हा प्रयत्न असेन. जप्त झालेली संपत्ती परत करण्याची तरतूद करावी जेणेकरून मुद्देमाल परत दिल्याने पोलीस ठाणे रिकामी होतील, अशा सूचनाही मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ड्रग्स संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती देताना फडणवीस म्हणाले, सरकार ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे.