पूर्णेत श्री संत गुरु रविदास महाराज व श्री कक्कया महाराज यांची जयंती उत्साह साजरी
सुशीलकुमार दळवी
पूर्णा,दि 01 ः
पूर्णा शहरात श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व कक्कया महाराज यांची जयंती दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शहरातील ज्ञानेश्वरी विद्या मंदिर परिसर गवळी गल्ली येथे चर्मकार समाज बांधव व राष्ट्रीय चर्मकार महा संघ पूर्णा च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून जयंती सुरुवात करण्यात आली. त्यावेळी स्वागतध्यक्ष म्हणून रा.च.म. प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड .उदघाटक रा.च.म. विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे.प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्हा अध्यक्ष मनिषा गायकवाड सहादू ठोंबरे मुरलीधर ठोंबरे वक्ते प्रा.विष्णू असोरे विनोद असोरे, मुरलीधर ठोंबरे, रामकिशन कांबळे,प्रकाश फुलपगार, अँड हर्षवर्धन गायकवाड, दादाराव पंडित, तुषार गायकवाड, बंटी रणवीर डॉ.चंद्रभान गंगासागरे डॉ. नागनाथ झुंजारे डॉ.भाग्यवंत,रामकिशन कांबळे, नरहरी सोनवणे,चांदोजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागताध्यक्ष आपल्या भाषणात संत रोहिदास महाराज यांचे 140 देशांमध्ये मंदिर आहेत व सर्व समाज संघटित झाल्यानंतर समाजाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही आपल्या जीवनामध्ये महापुरुषांची विचार मनात घेऊन कार्य केल्यास यशप्राप्ती होते असे बोलत होते . शहरातील गटई काम करणाऱ्या कामगारांना विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांच्या हस्ते गटई किट व छत्री वाटप करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुभाष सूर्यवंशी होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन असोरे तर प्रास्ताविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ पूर्णा तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती अध्यक्ष, सुशील गायकवाड, कार्याध्यक्ष सुशीलकुमार दळवी,बबन अन्नपूर्णे, पुरभाजी असोरे, हरी असोरे, शंकरराव जोगदंड, , अनिल नारायणकर, दीपक जोनवाल, लक्ष्मण परसुते, मुंजाजी असोरे, विकास गायकवाड,गजानन सूर्यवंशी, डॉ. नागनाथ, जुजारे,, रवि हराळे न्यानु असोरे , हरी जोगदंड, रोहिदास जोगदंड, धनराज आसुरे आदींनी परिश्रम घेतले यांनी केले