मराठा सेवा मंडळाचा व्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
परभणी,दि 06 ः
परभणी येथील भजन गल्ली सुभाष रोड येथे मराठा सेवा मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व शिवछत्रपती पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी शिवव्याख्याते वैष्णव देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती प्रकाश टाकला उपस्थिताना मार्गदर्शन केले. मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष होते,तर डॉ.विवेक नावंदर, रवींद्र पतंगे, नितीन देशमुख, एम पी कुलकर्णी, विठ्ठल तळेकर, गणेश सोळंके, ज्ञानेश्वर पवार, दिलीप ठाकूर, दादा लुबाळे, दीपक माने, माधव काकडे, शुभम सर, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती पुरस्कार वितरण केले. विविध सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला यामध्ये एड.चंद्रशेखर कुलकर्णी, कृष्णा तुकाराम कानडे, धुमाळे सर, दीपक ज्ञानदेव प्रधान, हभप बाळासाहेब घाडगे, ह भ प भगवान जाधव, सूर्यवंशी सर, इत्यादींना हा पुरस्कार देण्यात आला . या कार्यक्रमाचे आयोजक गोविंदराज इक्कर पाटील महानगर जिल्हाध्यक्ष मराठा सेवा मंडळ यांच्यातर्फे करण्यात आले होते
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नितीन देशमुख मराठा सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष यांनी केली सूत्रसंचालन जिजा चट्टे धर्मापुरीकर यांनी केले व आभार व्यक्त गोविंदराज इक्कर पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष मंगेश भ,मोहन लोंढे,अमोल आबिलवादे, सोमनाथ सावंत, रोहन इक्कर, ज्ञानेश्वर, बाळासाहेब कानडे, इक्कर, सुनिल कुलकर्णी, उमेश यरळकर, नवनाथ काकडे, दिपक माकीजा, चंदूभाऊ खोमाडे, शिवाजी माने, प्रल्हाद इक्कर, राम इक्कर, मंदार पाठक, गणेश चोपडे, रवि एनवार, बाळासाहेब सोनवणे, राजू दमाने, मुंजा कवडे, माऊली महाराज, मराठा सेवा मंडळ परभणी सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम केले.