पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा उभारणार,आ.डॉ.पाटील यांच्या प्रश्नाला मंत्री सामंत यांचे उत्तर
परभणी,दि 07 ः
परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे बांधकाम अद्याप सुरू न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात दिनांक सात मार्च रोजी केली.त्यावर उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. “सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल,” असे मंत्री सामंत यांनी आश्वासित केले.
यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त परभणी शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना होती. २६ ऑगस्ट २०१९ रोजी परभणी महानगरपालिकेच्या बैठकीत ठराव क्र. २३२ संमत करण्यात आला, ज्यामध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्समधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा निश्चित करण्यात आली.परंतु पुतळ्यासाठी निश्चित केलेल्या जागेवर अनधिकृत बांधकामे असल्यामुळे काम रखडले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
शासनाने अनधिकृत बांधकामे हटवून जागा तात्काळ रिकामी करावी व निधी उपलब्ध करून पुतळ्याच्या कामाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी यावेळी केली.त्यावर उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. “सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल,” असे मंत्री सामंत यांनी आश्वासित केले.