प पू गुरुवर्य श्री कालिदास महाराजांचा ६६ वा जन्मोत्सव सोहळा

0 41

सेलू / नारायण पाटील – “शिवाश्रम “श्री क्षेत्र गुंज ता पाथरी जी परभणी येथील प पू गुरुवर्य श्री कालिदास महाराजांचा ६६ वा जन्मोत्सव सोहळा येथील रेणुका मंगल कार्यालयात दि ८ व ९ मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे .त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

यामध्ये ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता महाराजांचे आगमन मंगल कार्यालयात होणार असून सायंकाळी ५ ते ७ यावेळेत ह भ प शरद बुवा घाग श्रीक्षेत्र नृसिहवाडी यांचे कीर्तन व रात्रौ ८ ते ९.३० या वेळेत दत्त पंचपदी व गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
९ मार्च रोजी सकाळी ५ वाजता महाराजांचे मंगल अभ्यंग स्नान होऊन ५.३० ते ६ यावेळेत भूपाळी व काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले आहे .

सकाळी ७ ते ८ या वेळेत पादुकांचे रुद्राभिषेकपुर्व महापूजन ,८ ते ९ या वेळेत मृत्युंजय महारथी शांती ,९ ते १० या वेळेत मार्कंडेय व सप्तचिरंजीव पूजन होऊन सकाळी १० वाजता प पू गुरुवर्य कालिदास महाराजांना पंचामृत स्नान घातले जाणार आहे .व ११ वाजता महाराजांची सप्तधान्य,पंचधातु व फळाची तुला केली जाणार आहे .१२ वाजता पुष्पांर्चन व महाराजांचा सत्कार सोहळा संपन्न होणार आहे .
व या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी सर्व भावीकभक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन आयोजकांनी केले आहे .

error: Content is protected !!