शनिवारी सकल मराठा समाजाकडून जिंतुरात बंदचे आवाहन

0 17

शेख वाजीद
जिंतुर,दि.07 ः
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी जिंतुर येथे अखंड मराठा समाजाच्यावतीने शनिवार दिनांक आठ मार्च रोजी बंद पुकारला आहे.

बीड जिल्हा येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी जनतेची मागणी आहे, असे म्हणत या हत्येचा खटला फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या अनुषंगाने जिंतुर येथे मराठा समाजाने पोलीसांना निवेदन दिले आहे.जिंतुर येथे शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे.

error: Content is protected !!