महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रभारी पदाचा कारभार देऊन महिला दिन साजरा
सेलू ( प्रतिनिधी )
आज रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सेलू पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पुरी मॅडम यांना प्रभारी पदाचा, सहाय्यक फौजदार श्रीमती दिवे मॅडम यांना पोलीस ठाणे अंमलदार, श्रीमती मोरे मॅडम यांना वायरलेस तर पोलीस हवालदार श्रीमती अस्मिता मोरे मॅडम यांना मदतनीस म्हणून पोलीस स्टेशनचे कामकाज पाहण्याची संधी दिली तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला आणि महिला दिन साजरा करण्यात आला आहे .
पोलीस निरीक्षक दीपक बोरसे व इतर अधिकाऱ्यांनी यावेळी पोलीस स्टेशनला हजर राहुल कामकाजा संदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन केले .
अशा प्रकारे हा एक आगळावेगळा महिला दिवस सेलू पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला .