महिला दिनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या पुरस्कारांचे वितरण
परभणी,दि 08 (प्रतिनिधीः
ग्रामीण भागात पाणी व स्वच्छता तसेच पाणी गुणवत्ता, परिसर, वैयक्तिक स्वच्छता अशा विविध घटकावर आधारित महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने ग्रामपंचायतींना दिल्या जाणाऱ्या संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान 2023 -24 या वर्षातील पुरस्कारांचे वितरण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत करण्यात आले.
शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सन २०२३-२४ या वर्षातील संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन) ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छ भारत मिशन) शिवराज केंद्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) रेखा काळम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आशा गरुड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर जी स्वामी यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या ग्रामपंचायतींना मिळाले जिल्हास्तरीय पुरस्कार
प्रथम पुरस्कार रुपये ६ लक्ष – ग्रामपंचायत काजळे रोहिणा ता.सेलू सरपंच – अर्चना भारत इंद्रोके, द्वितीय पुरस्कार रुपये ४ लक्ष – ग्रामपंचायत कुंभारी ता.जिंतूर सरपंच – पार्वती शेषेराव हारकळ, तृतीय पुरस्कार रुपये ३ लक्ष – ग्रामपंचायत सावळी ता.मानवत सरपंच – अनुजा माणिकराव काळे,
या तीन ग्रामपंचायतींना मिळाले जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार
स्व.वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत निमगाव ता.सोनपेठ सरपंच – ज्योती तुकाराम भालेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत गुंज ता.पालम सरपंच कमल किशन काळे, स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार ग्रामपंचायत धनगर मोहा ता.गंगाखेड सरपंच – संगीता ज्ञानोबा खांडेकर विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे नियोजन स्वच्छ भारत मिशन विभागाचे उप मुख्य कार्यकारी शिवराज केंद्रे व त्यांच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आले.
गाव विकासासाठी महिलांनी स्वतः पुढाकार घेणे गरजेचे आहे तसेच तसेच गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा प्रमुख गोष्टीच्या विकासासाठी महिलांना पुरुषांनी आवश्यक ती मदत करावी.
नतिशा माथूर
मुख्य कार्यकारी अधिकारी