उभ्या दुचाकीला चारचाकी वाहनाची धडक,सोळा वर्षाच्या मुलाचा मृत्यु

0 160

परभणी,दि 17 ः
मोठ्या भावाला बारावी परीक्षेसाठी बस स्थानकावर सोडून दुचाकीसह उभ्या राहिलेल्या किशोरवयीन मुलाला चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात विकास उत्तमराव शेळके वय सोळा वर्षे रा. आनंदवाडी ता. परभणी याचा मृत्यू झाला ही घटना वाकडी पाटीवर सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
दैठणा पोलीस ठाण्यातील घटनास्थळी सपोनी अशोक जायभाये, एसआय बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे, जीआर फड, गृहरक्षक जवान अमोल कच्छवे यांनी भेट दिली. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.एम एच 22 बीसी 34 23  या वाहनाने विकासच्या दुचाकी क्रमांक एम एच 22 ए आय 0402 या दुचाकीला धडक दिली.मयत विकास हा यंदा दहावीची परिक्षा देणार होता.चुलत भावाची बारावीची परिक्षा असल्याने त्याला सोडुन तो उभा असताना हा अपघात घडला.

error: Content is protected !!