घराला लागलेल्या आगीत जीवनावश्यक साहित्य जाळून खाक
पाथरी / रमेश बिजुले – पाथरी तालुक्यातील उमरा तांडा येथील बालाजी रमेश पवार (सुरक्षा रक्षक)यांचे घर 2 मार्च रविवार सकाळी देवपूजा करून दिवा लावून दिव्याच्या साह्याने पेट घेतला अचानक आग लागली घरातील साहित्य जळून खाक झाले. त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे. यावेळी कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही.या आगीत बालाजी रमेश पवार (सुरक्षा रक्षक) यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला. यात सुमारे तीन लाख रुपयाचे रुपयांचे नुकसान झाले. सदर घर बालाजी रमेश पवार यांनी शासनाच्यावतीने मदत देण्याची मागणी गावकºयांकडून करण्यात येत आहे.
उंमरा तांडा येथील बालाजी पवार यांच्या घराचे घरालगतच एका झोपडीत त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.रविवारी सकाळी देवपूजा करून बाहेर पाणी आणण्यासाठी गेला. तेवढयात अचानक घरामध्ये आगीने भडका घेतल्याचे त्याला दिसले. घरामध्ये फ्रीज कुलर सोपा गव्हाचेज्वारी बाजरी कट्टे घरातील वस्तू जाळून खाक झाले तीन लाखाचे नुकसान झाले असल्यामुळे कोणीच घरात प्रवेश केला नाही. आगीत घरातील फ्रीज कुलर सोपा गव्हाचे जवारी बाजरी कट्टे घरातील वस्तू जाळून खाक झाले तीन लाखाचे नुकसान झाले. शेती उपयोगी साहित्य, लोखंड कापण्याचे यंत्र, गादी, कपडे, धान्य, स्वयंपाकाचे भांडे, यासह 50 हजार रुपये रोख रक्कम, आदी साहित्याचा कोळसा झाला.आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे आज बाजूने पाणी घेऊन आग विझविण्यात आली. घरात कोणीच हजर नसल्यामुळे जीवितहानी टळली. बालाजी पवार (सुरक्षा रक्षक) त्यांचे दोन भाऊ सचिन पवार व सुरेश पवार हे दोघजण ऊसतोड मजूरी काम करून उदरनिर्वाह करतात. आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक नाही. तलाठी यांनी पंचनामा करून तहसील कार्यालयात तातडीने अहवाल सादर केला.
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ कोल्हे यांनी बालाजी पवार कुटूंबियांना भेट देवून सांत्वना केली व मदतीचे आश्वासन दिले.