कृषि विद्यापीठाचे अनुदान बंद करा,आ.राजेश विटेकर यांची विधानभवनात मागणी

0 293

परभणी,दि 21 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा अमदनी अठ्ठनी  खर्चा रुपया  अशी अवस्था झाल्याने विद्यापीठाचे अनुदान बंद करा अशी मागणी पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी विधानभवनात शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी केली आहे.यावेळी विद्यापीठाच्या कारभारावर आमदार विटेकर यांनी ताशेरे ओढले आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राजेश विटेकर यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या निष्क्रिय कामगिरीचे वाभाडे काढले, यावेळी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना आमदार विटेकर यांनी सांगितले की, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शेतकऱ्यांपेक्षा अत्यल्प उत्पादन मिळवणाऱ्या परभणी कृषी विद्यापीठाच्या कारभारामुळे जनतेत अनास्था निर्माण झाली आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण अशा शब्दात आमदार विटेकरांनी विद्यापीठातील संशोधक आणि इतर अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. विद्यापीठाचे किरकोळ उत्पादन लक्षात घेता पांढरा हत्ती कशाला पोसता असा सवाल त्यांनी केला आहे, एकरी तीन क्विंटल सोयाबीन उत्पादन तर मुगाचे एकरी एक क्विंटल इतकी अत्यल्प उत्पादन काढणाऱ्या विद्यापीठावर त्यांनी जोरदार टीका केली. विद्यापीठाला दरवर्षी 100 कोटी रुपयांचे अनुदान मिळते, यापैकी दोन कोटी रुपये संशोधनासाठी खर्च केले जातात तर 34 कोटी रुपये मजुरांची बनावट हजेरी दाखवून उचलण्यासाठी खर्च केले जातात हा प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे सांगितले,प्राध्यापकांना प्रति महिना एक ते अडीच लाख रुपये पगार असताना आणि  विद्यापीठावर हजारो कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या उपयोगी नसेल तर अशा विद्यापीठावर खर्च करण्याची  गरज काय ? त्यामुळे विद्यापीठाचे अनुदान बंद करा,विद्यापीठातील काम आणि शिका या नियमाप्रमाणे विद्यापीठाने स्वतःचे कृषी उत्पादन वाढवून स्वतः सक्षम व्हावे व संशोधन वाढवावे आणि विद्यापीठ चालवावे अशी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात यावी अशी देखील मागणी आमदार विटेकर यांनी केली.

error: Content is protected !!