पाथरीत राष्ट्रवादीकडून आ.राजेशदादा विटेकर यांना मिळाली उमेदवारी

0 16

परभणी,दि 21 ः
राष्ट्रवादी अजित पवार गट उमेदवारांची पहिली यादी  जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार यांनी  उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना देवगिरी बंगल्यावर एबी फॅार्मचे वाटप केले. आतापर्यंत 17 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आपेक्षेप्रमाणे पाथरी मतदार संघात आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते राजेश विटेकर यांना समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मोठी ताकद आहे. आमदार राजेश विटेकर यांच्या रूपाने या मतदारसंघात महायुतीला मातब्बर आणि खंबीर उमेदवार असल्याने मागील अनेक दिवसांपासून आ.विटेकर यांनी विधानसभा लढवावी असा सूर राष्ट्रवादीत वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला होता. पाथरी मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षात देखील तुल्यबळ उमेदवार नसल्याने आ. विटेकर यांनीच निवडणुकीच्या मैदानात उतरावे अशी मागणी होऊ लागली. सोनपेठ, पाथरी, मानवत यासह परभणी ग्रामीण या भागात आ.विटेकर यांची मोठी ताकद आहे.विटेकरांना मानणारा एक वर्ग आहे. सोनपेठ आणि पाथरी या दोन तालुक्यात विटेकरांची मजबूत पकड असल्याने आ. विटेकरांचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो त्यामुळे त्यांनीच निवडणूक लढवावी अशी मागणी झाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी राजेश विटेकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. सोमवारी पहिल्या यादीत सतरा जणांना एबी फॉर्म देण्यात आले. त्यात आ. विटेकर यांचा देखील समावेश आहे. अद्याप महाविकास आघाडी कडून उमेदवाराची घोषणा झाली नाही त्यामुळे विटेकर यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून कोण हे अजूनही गुलदस्तात आहे.

error: Content is protected !!