वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण व्हावी – डॉ.दि.भा जोशी

ज्ञानोपासक महाविद्यालयात नरेंद्र दाभोळकरांचे विचार घरोघरी या मालिकेतील पंधरा पुस्तकांचा लोकार्पण सोहळा संपन्न

0 7

परभणी – आपले ध्येय हे आदर्श समाज निर्मितीची आहे त्यासाठी विवेकाचा आवाज बुलंद करू या आपल्या प्रगतीचे सामाजिक भान असले पाहिजे आणि त्याचा सन्मान केला पाहिजे. यातून आनंद प्राप्त होतो मनुष्याची प्रगती वैज्ञानिक मार्गाने व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून एकात्मतेची भावना निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी जागृत होणे आवश्यक आहे. यातून राष्ट्राचा विकास होईल ही प्रेरणा नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांमधून मिळेल आणि आदर्श समाजाची निर्मिती होईल असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.दि.भा जोशी यांनी केले.

 

मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणी व समाजशास्त्र विभाग ज्ञानोपासक महाविद्यालय,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पुस्तकांचा लोकार्पण सोहळा ज्ञानोपसक महाविद्यालय, परभणी येथे संपन्न झाला.

 

 

अंधश्रद्धेतून जी क्रूरता निर्माण होते त्याला आमचा विरोध आहे यासाठी विज्ञानवादी विचार आचरणात आणावे असे आवाहन या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शेख मोहम्मद बाबर यांनी केले.

 

याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. संदीप पाटील, डॉ. परमेश्वर साळवे, प्राचार्य प्रल्हाद मोरे, मुंजाजी कांबळे, डॉ. अंबादास कदम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल गवळे तर आभार प्रदर्शन डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले.

error: Content is protected !!