सेलूत सात वर्षीय बालकावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
या आठवड्यातील त्या भागातील ही दुसरी घटना
सेलू / नारायण पाटील – येथे नगरपालिकेच्या असलेल्या जुन्या कंपोज (कचरा डेपो ) कडे जाणाऱ्या रस्त्यावरील एकबालनगर या ठिकाणी शेख नोमान रफिक वय सात वर्ष बालक आपल्या घरी जात असताना त्या ठिकाणी असलेल्या चार ते पाच कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असता त्या ठिकाणाहून मोटर सायकल वर जात असलेले जहीर अब्बास हाश्मी व शेख आसिफ शेख आरिफ या दोन जणांनी वेळप्रसंगी धावत जाऊन त्या मुलाचा त्या मोकाट कुत्र्यापासून बचाव करीत जीव वाचवला त्यानंतर झालेल्या घटनेची माहिती परिसरातील नागरीकांना मिळतात त्या ठिकाणी जमाव जमला असता नगरपालिकेच्या कारभारा विरोधात तीव्र राग व्यक्त केला.
गेल्या महिन्यात गुलमोहर कॉलनी येथील अश्याच लहान बालक चा चावा कुत्र्या नी घेतला होता .त्यावेळी नागरिकानी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते परंतु न प प्रशासनाकडून याबाबत काहींच कार्यवाही केली गेली नाही . त्यामुळेच त्या भागातील ही या आठवड्यातील दुसरी घटना असून या परिसरातील पालकांना आपल्या लहान मुलांची काळजी वाटत असून मुलांना एकटे सोडणे सुद्धा अवघड झालेले आहे. याबाबत अनेक वेळा नगरपालिकेतील लेखी निवेदन व तोंडी सांगून सुद्धा नगरपालिका प्रशासन कोणतीही उपायोजना करीत नाही व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुद्धा होत नाही नगरपालिका प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची तर वाट बघत तर नाही ना असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे . हीच घटना एखाद्या एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधी किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत घडली असती तर नगर परिषदेने अशीच बघ्याची भूमिका घेतली असती का ? असा देखील प्रश्न संतप्त नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे . शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त व्हावा अशी नागरिकांमधून होत आहे .