दिव्यांग संघटनेकडून तहसीलदार सेलू यांना मागण्यांचे निवेदन सादर
सेलू / प्रतिनिधी – येथील दिव्यांग हक्क मोर्चा संघटनेच्या वतीने आज सेलूचे तहसीलदार शिवाजी मगर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .
यामध्ये शहरातील सर्व शासकीय कार्यालय आवाराच्या बाहेर दिव्यांग व्यक्तिंना ये जा करण्यासाठी रँम्प बसविणे,तसेच शासन निर्णयानुसार दिव्यांगांना अंत्योदय राशनकार्ड उपलब्ध करून देणे,व दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ मिळवुन द्यावे .आदि मागण्यांचा समावेश आहे .
यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंकुश पांढरे,जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर,उपजिल्हाध्यक्ष मोहनराव साखरे,तालुकाध्यक्ष डीगांबर घोळवे,शहराध्यक्ष उत्तमराव लोखंडे,उपतालुकाध्यक्ष ओमप्रकाश गात,तालुकासंघटक चंद्रशेखर शिंदे,शैलेश नवघरे,विष्णु नाईकनवरे,दिपक वानरे,शिवरुद्र क्षीरसागर,मन्सुर खान पठान,अशोक डाके,सोनाजी अंभोरे, व संघटनेचे आदी पदाधिकारी दिव्यांग बांधव उपस्थित होते.