रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा ‘आर्यन खान’ सह ८ जण NCBच्या ताब्यात

0 229

मुंबई – नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईत बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शहारुख खानचा (Shah Rukh Khan)  मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan’s son Aryan Khan) याला अटक करण्यात आली (NCB arrest Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan)आर्यनसह ८ जणांना देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एकूण दहा जणांना केलेल्या अटकेत २ महिलांचा देखील समावेश असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. सध्या आर्यन खानसह इतरांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या दोन महिला या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समोर येत आहे.

shabdraj reporter add

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या १० जणांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत आणले. आर्यन खानची सध्या एनसीबीकडून चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान आर्यनने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’,  असल्याचा खुलासा केला. यासंबंघीतील वृत्त एबीपी माझाकडून देण्यात आले.

या प्रकरणी कार्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस क्रूझचे मालक आणि पार्टीचे आयोजन करणाऱ्या कंपनीच्या मालकांना एनसीबीकडून समन्स बजावण्यात असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक माहिती रविवारी दुपारी एनसीबीचे मुंबई झोनल ऑफिसर समीर वानखडे देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!