आदर्श शिक्षक पुरस्कारातून इतर शिक्षकांना प्रेरणा मिळते- डॉ.संजय रोडगे
सेलू ( नारायण पाटील )
इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराचे कार्यक्रम घेतले जातात .असमाधानी माणसेच भविष्यात प्रगती करू शकतात .खाजगी शाळेत सर्व गोष्टी उपलब्ध असतात परंतु आहे त्या उपलब्ध सुविधेतून विद्यार्थी घडवण्याचे काम जिल्हा परिषदेचे शिक्षक करीत असतात .शिक्षकी पेक्षा हा एक सेवा व्यवसाय असतो .आपला विद्यर्थ्यांना उच्च पातळीवर जातात तेंव्हाच शिक्षकांना खरा आनंद व समाधान मिळत असते .चांगले विद्यार्थी घडवण्याचे व समाज उभारणीचे काम शिक्षकच करीत असतात . देशभक्त जागृत करण्याचे काम सुजाण नागरिकांनी करावे. घराप्रमाणे शाळा माझी आहे ही भावना जागृत झाली तरच आपण खरे देशभक्त घडणार आहोत .असे विचार श्रीराम प्रतिष्टान चे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात केले .
येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ (ता.६) वार शुक्रवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विप्रज्वलन व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, डॉ. ऋतुराज साडेगावकर मा. डॉ. राजेंद्र गात, ज्येष्ठ पत्रकार मा. श्री. नारायण पाटील, मा. दिलीप डासाळकर, सौ .साडेगावकर ,सौ .गात संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा घटक संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बोडखे यानी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा परभणी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जि.प.प्रा. शाळा वाई येथील मा. कुंभार अशोक रामराव यांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार यासेर उर्दुर प्राथमिक शाळेचे मा. पठाण जावेद खान फेरोज खान यांना तर नाविण्यपूर्ण शिक्षक पुरस्कार ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथील शिक्षक मा. भरणे कपिल मनोहर या सर्वांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच एल . के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. अर्जून गरूड, प्रा. नारायण चौरे व प्रा. ममता दास तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा . आशा गायकवाड व प्रा. श्याम देशमुख तसेच बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. कल्पना भाषक व प्रा. राहुल साह यांना देण्यात आला. क्यूरिअस किड्स मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार अंजली कलाडिया प्राॅस्पेरस पब्लिक स्कूल मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा . सपना दगडु तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा. दिपा सावंत बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. सारिका ताठे तर फीन किड्स मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार धनश्री हुगे, ज्ञानतीर्थ विद्यालयामधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. इंद्रजित मोरे व प्रा. साबळे सुचिता तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार खराण लक्ष्मीकांत व जुमडे अश्विनी बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड प्रा. आकात संदिप, जिज्ञासा बालविहार मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. नेहा देशमुख, उत्कर्ष विद्यालयातुन आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. आतकरे पुनम, उपक्रमशील पुरस्कार प्रा. परळीकर वैशाली तर बेस्ट डिजीटल टिचर अवार्ड शिवानंद हाके, अपुर्वा पाॅलीटेक्नीक मधुन आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा. इंगोले गौतम तर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रा.वाघ श्याम , डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालय मधून आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. बबन सोनवणे, आदित्य अध्यापक विद्यालयातुन उपक्रमशील शिक्षक पुरस्कार म्हणून प्रा. सोनार गणेश यांना देण्यात आला.
यावेळी बोलतांना संजय रोडगे पुढे म्हणाले की , भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वांत महत्त्वाचे स्थान आहे ते गुरुला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व कृतीयुक्त शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविले पाहिजे. शिक्षकांनी सर्वप्रथम स्वतः मध्ये विद्यार्थी प्रतिअमुलाग्र बदल करणे अपेक्षित आहे. संस्थेच्या वतीने आज आपण आदर्श शिक्षक पुरस्कार व उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे त्यांचे विषेश अभिनंदन व आभार संस्थेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असे बोलतांना डॉ. संजय रोडगे म्हणाले.
सुखदेव घुले, कुंभार अशोक, डॉ. ऋतुराज साडेगावकर ,दिलीप डासाळकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप आकात, कल्पना भाबट यांनी केले .तर दिगंबर टाके यांनी उपस्थितांचे आभार मानले.