कोरोनानंतर चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार, भारतात आरोग्य यंत्रणा सतर्क…
चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. करोनाच्या विषाणूला यशस्वीरीत्या पराभूत करण्यात जगाला यश आलं असलं, तरी आता पुन्हा एकदा चीनमधूनच आलेल्या एका नव्या विषाणूने जगभरातल्या शासनकर्त्यांची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये HMPV नावाच्या एका नव्या विषाणूचा फैलाव होऊ लागला असून मोठ्या प्रमाणावर या विषाणूची लागण चीनमध्ये नागरिकांना झाल्याचं सांगितलं जात आहे.
चीनमधील एचएमपी विषाणूचा (HMPV Virus) आता भारतातही शिरकाव झाला आहे. कर्नाटक तसेच गुजरातमध्ये एचएमपीव्हीचा रुग्ण आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य यंत्रणा संतर्क झाली असून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यावर राज्याचे सार्वजानिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रीप्रकाश आबिटकर यांनी नागरिकांनी काळजी करू नये, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.
आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर म्हणाले, ‘मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) श्वसन संसर्गास कारणीभूत ठरतो. हा विषाणू पहिल्यांदा नेदरलँडसमध्ये २००१ मध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी साथरोग आहे आणि फ्ल्यूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो.