शिवसेनेच्या पराभवानंतर ट्विट करत संभाजीराजे छत्रपतींची सेनेवर बोचरी टीका

0 188

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत ( Rajya Sabha Election Maharashtra ) भाजपच्या तिन्ही उमेदवारांचा विशेष करून कोल्हापूरच्या धनंजय महाडिक यांचा मोठा विजय झाला. या विजयावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

 


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत…
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll

 

म्हणजेच, “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”.

 

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा केली होती. तर शिवेसनेने त्यांना उमेदवारीसाठी शिवबंधनाची म्हणजेच शिवसेनाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण संभाजीराजे अपक्ष लढवण्यावर ठाम राहिले. यामुळे शिवसेनेने कोल्हापूरमधील पक्षाचे नेते संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली होती. तसंच शिवसेनेने संभाजीराजे छत्रपतींवरही निशाणा साधला होता.

error: Content is protected !!