अजित पवार नॉट रिचेबल,लगेच उध्दव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट,काय चालययं
मुंबई : मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. नागपुरातील मंत्र्यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.अजित पवारांच्या नाराजीची चर्चा विधानभवनात सुरु आहे. अजित पवार यांच्या नाराजीच्या चर्चेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपला २०, शिंदे गटाला १२ तर अजित पवार गटाला ९ मंत्रिमंधे मिळाले आहेत. महायुतीच्या मंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता खातेवाटप होणे बाकी आहे. त्यामुळे साऱ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे लागले आहेत. खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखाते मिळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, मागील दोन दिवसांपासून अजित पवारांना अर्थखाते मिळणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
खातेवाटपात अजित पवारांना अर्थखाते मिळणार नसल्याची विधानभवनात कुजबुज सुरु झाली आहे. खातेवाटपात गृह, अर्थ आणि नगरविकास खाते भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीत होणाऱ्या खातेवाटपात अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळणार नसल्याची चर्चा आहे. महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता अंतर्गत नाराजी समोर आली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदेंना नगरविकास खात दिलं जाणार नाही, अशी चर्चा झाली. आता राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणती खाती येणार? हे पाहणे महत्वाचं आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतली फडणवीस यांची भेट
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर, दोन्ही नेते पहिल्यांदाच भेट घेत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मात्र, या भेटीत नेमकी कोणती चर्चा होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनात पोहचले. विधान भवनात पोहचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदारांशी चर्चा केली आणि नंतर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री दालनात पोहोचले. दोघांमधली ही सदिच्छा भेट मानली जात आहे. मुख्यमंत्री यांची भेट घेण्यासाठी फक्त उद्धव ठाकरे नसून, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत.