परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी ब्राम्हण समाजाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

0 62

काल दि. ११ ऑगस्ट २०२४ रोजी सेलू येथे सकल ब्राह्मण समाजाची बैठक संपन्न झाली. बैठकीत परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागणी संदर्भात समाजाची पुढील दिशा काय असेल या संदर्भात चर्चा झाली.

 

या बैठकीत ठरल्या प्रमाणे…मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी अधिकृत घोषणा करूनही ८ महिने होऊन सुद्धा महामंडळ संदर्भात त्याची अंमलबजावणी केलेली नाही. समाजाच्या याच मागणी संदर्भात राज्य सरकारला केलेली अधिकृत घोषणेचे स्मरण करून देण्यासाठी सकल ब्राह्मण समाज जिल्हा परभणी व संघर्ष समितीच्या वतीने दिनांक १३ ऑगस्ट २०२४ मंगळवार सकाळी १०:३० वाजता परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर परभणी येथे एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

परभणी जिल्हातील सर्व तालुक्यातील समस्त ब्राह्मण समाजातील बंधू आणि भगिनींनी समाज कार्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.. असे आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सेलू च्या वतीने बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक स्वप्नील पिंगळकर, नंदू काका पराडकर, दिपक भाऊ कासांडे, भगवानराव पाटील व भगवान परशुराम जन्मोत्सव समिती सेलू चे सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती

error: Content is protected !!