लाडक्या बहिणसाठी पोस्ट खात्याचा अभिनव उपक्रम,पकिटातून भेटणार राखी

0 45

सेलू(नारायण पाटील )

भारतातील कोणत्याही भागात अवघ्या तीन दिवसात आपल्या लाडक्या भावाला राखी पोहचण्यासाठी केंद्र शासनाच्या पोस्ट खात्याने अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये एक खिडकीच सजवण्यात आली असून तिथे लाडक्या बहिणीसाठी प्लस्टिक कोटेड राखी पाकीट मिळणार आहे .
:महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहिणीला आर्थीक आधार मिळावा या उदात्त हेतूने नूकतीच लाडकी बहिण योजना घोषीत करून प्रतिमाह १ हजार ५०० रूपये आर्थीक मदत देण्याची घोषणा केली आहे.ही योजना जूलै महिन्यापासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येत असून सोमवार १९ आँगस्ट पासून म्हणजेच राखी पौर्णीमेपासून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सदरिल रक्कम जमा करणार आहे.राज्य शासनाच्या सदरिल घोषणेला अनूसरून केंद्र शासमाच्या पोस्ट खात्याने देखील राखी पौर्णीमा निमित्ताने एका अभिनव उपक्रमाची घोषणा केली आहे.देशाच्या कोणत्याही भागात अवघ्या तीन दिवसात राखी पोहचविण्यासाठी पोस्ट खाते विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील मूख्य डाकघर व उप डाकघर या ठिकाणी स्वतंत्र एक खिडकी फूलांनी सजवन्यात आली असून सदरिल खिडकी मार्फत लाडक्या बहीणीसाठी प्लास्टीक कोटेड राखी पाकिट उपलब्ध करण्यात येणार आहे.
सोमवार १९ आँगस्ट पर्यंत सदरिल सूशोभीत खिडकी मार्फत प्लाँस्टीक कोटेड पाकिट देण्यात येणार असून त्याच सूशोभीत खिडकी मार्फत राखी असलेले पाकिट देखील स्विकारण्यात येणार आहे .अशी माहिती पोस्ट मास्तर विठ्ठल जोगदंड व अंजु काष्टे यांनी दिली आहे . आहेत.
यासाठी पोस्ट खात्यातील कर्मचारी सूट्टीच्या दिवशी देखील काम करून देशातील कानाकोप-यात अवघ्या तीन दिवसात प्रत्यक्ष भावाच्या हातात राखी मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे . राज्यभरात २आँगस्ट पासून ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.याशिवाय जगातील कोणत्याही भागातील भावासाठी पाठवणा-या लाडक्या बहीणीची राखी देखील स्पीड पोस्टाव्दारे अवघ्या आठ दिवसात भावांच्या हातात पडेल अशी व्यवस्था पोस्ट खात्याअंतर्गत करण्यात आली आहे.त्यामूळे देशातील व परदेशातील बहिणींच्या राख्या लाडक्या भावांना राखी पौर्णीमेपूर्वी मिळणार आहेत.सेलू शहरातील दोन पोस्ट कार्यालयाप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमूख शहरातील मूख्य पोस्ट कार्यालयात राख्या पोस्ट करण्यासाठी वेगवेगळे रंगीत बाँक्स लावण्यात येणार आहेत.यात विशेषबाब म्हणजे शासकीय सूट्टी असतांना देखील राखी पाठविण्याची व्यवस्था सर्व पोस्ट कार्यालयातंर्गत करण्यात आली आहे.त्यामूळे लाडकी बहिण व लाडक्या भावासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विशेष उपक्रमामूळे राखी पोर्णीमा उत्सव त्यांच्या साठी एक प्रकारे पर्वणी ठरणार आहे.

 

error: Content is protected !!