मराठवाड्यातील दुष्काळावार मात करण्यासाठी प्रकल्पाची घोषणा

0 41

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर केला. निवडणूक निकालानंतर महायुती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर करणाऱ्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध समाजघटकांसाठी, विभागासाठी तरतूद केली आहे. मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील दुष्काळावर राज्य सरकारकडून भगिरथी प्रयत्न होणार आहेत. कोकणातील नद्यांचे पाणी मराठवाड्यासाठी वळवण्यात येणार आहे. त्याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठीदेखील तरतूद करण्यात आली आहे.

कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा आज अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली.

> मराठवाड्यातील सिंचन क्षमतेत वाढणाऱ्या प्रकल्पामुळे सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाचे सर्वेक्षण व अन्वेषण सुरू – तांत्रिक बाबींचा अभ्यास करून लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात होण्याची शक्यता.

> कोकणातील जलसंपत्तीचा प्रभावी उपयोग – अतिरिक्त पाणी वाया न जाता कोरडवाहू भागासाठी वापरण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांना दिलासा – सिंचन सुविधांमुळे शेती उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मराठवाड्याच्या पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणात निचरा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

> गोदावरी खोरे पुनर्भरण व मराठवाडा ग्रीड हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 37 हजार 668 कोटी रुपये आहे.

> दमणगंगा -एकदरे -गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून त्यामुळे जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील 9 हजार 766 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होईल. नाशिक जिल्ह्यातील 2 हजार 987 हेक्टर क्षेत्रालाही यामुळे सिंचनाचा लाभ होईल. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 2 हजार 300 कोटी रूपये आहे.

error: Content is protected !!