शिंदे गटाच्या युवासेना कार्यकारिणीची घोषणा,’हे’ आहेत पदाधिकारी

0 52

मुंबई, 30 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. शिवसेना पक्षावर दावा केल्यानंतर आता शिंदे गटाचं पुढचं लक्ष्य आदित्य ठाकरे यांची युवा सेना आहे. याचाच भाग म्हणून एकनाथ शिंदे गटाने युवासेनेच्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे आदित्य ठाकरेंसोबत काम करणाऱ्यांनाच शिंदेंच्या युवासेनेच्या कार्यकारिणीमध्ये जबाबदारी देण्यात आली आहे.

युवासेनेची कार्यकारिणी

उत्तर महाराष्ट्र :

अविष्कार भुसे

मराठवाडा :

अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील

कोकण :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे

पश्चिम महाराष्ट्र :

किरण साली, सचिन बांगर

कल्याण भिवंडी :

दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक

ठाणे, नवी मुंबई व पालघर :

नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे

मुंबई :

समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे

विदर्भ :

ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सगळ्यात पहिले शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आले, यानंतर 12 खासदारांनीही शिंदेंची साथ दिली, तसंच शिवसेनेचे काही पदाधिकारीही शिंदे गटात गेले, यानंतर आता त्यांनी युवासेनेची कार्यकारिणी जाहीर केली आहे. शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? याचा निकाल आता निवडणूक आयोगात लागणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये या संघटनांचे पदाधिकारी महत्त्वाचे ठरू शकतात.

error: Content is protected !!