फुकटगाव भुयारी पुलाबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे आश्वासन
पूर्णा,दि 17 ः
फुकटगाव भुयारी पुलाबाबत प्रलंबित प्रकरणामध्ये पर्याय व्यवस्था करून दिली व कायमस्वरूपी मार्ग काढण्याचे दिले अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
रेल्वे प्रशासनामार्फत तयार केलेला फुकटगाव भुयारी पुल वाहनासाठी व पादचाऱ्यांसाठी कायमस्वरूपी डोकेदुखी ठरला आहे.कारण या भुयारी पुलाचे काम सदोष आहे.
ऊस वाहतूक करणारे ट्रक ट्रॅक्टर या फुला खालून जाताना पलटी झालेली आहे.
मोठ्या प्रमाणावर पादचारी शेतकरी कष्टकरी व विद्यार्थी या फुला खालून जात असतात त्यांच्या जीवनाला सुद्धा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.याबाबत प्रदीप ननवरे यांनी पाठपुरावा केला होता.त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत संवेदनशील राहून येत्या बुधवारी मोजमाप सुरू करून काम सुरू करण्यात येईल अशाप्रकारे आश्वासित केले.यावेळी
नायब तहसीलदार प्रशांत थारकर,रेल्वे अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे पोलीस अधिकारी, व रेल्वेचे गुत्तेदार, सरपंच गावकरी उपस्थित होते.