बाल विद्यामंदिर हायस्कूल येथे कै. म.शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धा

0 3

परभणी : शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल, नानलपेठ, येथे दिनांक 24 डिसेंबर 2024 वार मंगळवार रोजी कै. म.शं. शिवणकर विभागीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2024 हे वर्ष कै.म.शं. शिवणकर गुरूजी यांचे जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या स्पर्धेचे 49 वे वर्षे असून , ही स्पर्धा इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यासाठी निःशुल्क असून पुढील पैकी एका विषयावर प्रत्येक शाळेतून एका स्पर्धकास आपले विचार मांडता येतील. प्रत्येक स्पर्धकास आपले विचार व्यक्त करण्यासाठी पाच मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकास प्रथम पारितोषिक 2500 रू , द्वितीय पारितोषिक 2000 रू , तृतीय पारितोषिक 1500 रू व दोन उत्तेजनार्थ पारितोषिक 700 रू तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. तरी सदरील स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.स्पर्धेचे विषय १)भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव 2) चला लोकशाही जपूया ! 3) माणुस घडविणारे शिक्षण… 4) मोबाईलचा अतिवापर : चिंता आणि चिंतन
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री जी. के. जुमडे (मो.9403223298), श्री.एस.बी. ढगे ( मो. 9420250481) ,श्री. एम.जी. शेवाळे (मो. 7588397851) यांच्याशी संपर्क करावा.

error: Content is protected !!