मराठी राजभाषा दिनानिमित्त रंगणार बालकुमार मराठी साहित्य संमेलन
श्रीरामपूर / प्रतिनिधी – अहमदनगर शहरातील डॉ.ना.ज.पाऊलबुधे शैक्षणिक संकुल आणि दोस्ती फाउंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषादिनाचे औचित्य साधून अहमदनगर शहरातील डॉ. ना. ज.पाऊलबुधे शैक्षणिक संकुल अहमदनगर येथे रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी खास शालेय विदयार्थ्यांचे राज्यस्तरीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या काव्यसंमेलनात राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना स्व:रचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.तसेच सादरीकरणा नंतर सन्मानचिन्ह आकर्षक प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत कौतुक सोहळा पार पडणार आहे.
काव्यसंमेलनात राज्याचे शिक्षण सहसंचालक रमाकांत काटमोरे,बालभारती पुस्तकातील कवी धोंडीरामसिंह राजपूत ,संस्थेचे प्रमुख विनयजी पाऊलबुद्धे,साई पाऊलबुद्धे,श्रद्धा पाऊलबुद्धे,आर.डी.बुचकूल,आर.ए.देशमुख,दादासाहेब भोईटे,रेखाराणी खुराणा
,प्राचार्य भारत बिडवे,अनिता सिद्दम,वाहतूक पोलीस निरीक्षक शमुवेल गायकवाड,भाऊसाहेब कबाडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मराठी राजभाषा दिनानिमित्त भारत बिडवे,अनिता सिद्दम,श्वेता गवळी,नाना डोंगरे,डॉ.शैलेंद्र भणगे,वर्षा कबाडी,विजय मते,मंगल ससे,स्मिता गायकवाड यांना दोस्ती फाउंडेशनच्या वतीने पुरस्कृत केले जाणार आहे.साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज आणि गाडगे महाराज जयंतीनिमित्त कु.ओवी काळे,विराज हाळनोर ,कृष्णा हाळनोर,हे बालव्याख्याते व्याख्यान सादर करतील. तसेच कु.तन्वी नामदेव नागरे,रेणुका अमोल ताठे,प्राजक्ता सुभाष पालवे,कोमल धनेश इंगळे,ईश्वरी शिवदास ढाकणे,वेदिका अरुण विघ्ने,निदान हमीद पठाण,सुरज अंबादास ढाकणे,आदित्य बबन बुधवंत,ऋतिका अशोक सोनवणे,करण पिनाजी गाढवे,भारत दीपक शिंदे, प्रज्वल प्रताप थोरवे,साईराज नामदेव नागरे,अथर्व समिंद्र तुपे,अथर्व संजय गुंजाळ,अमृता मंगेश सातपुते,समृद्धी संतोष सुर्वे,सृष्टी गणेश वडे,भक्ती अंबादास सरोदे,प्रबोधिनी राम पठाडे,दुर्गा विजय कवडे,प्रतीक्षा रामभाऊ गायके,स्वरा सचिन परभणे,सिद्धी संदीप आव्हाड,अभिमान राहुल इंगोले,अवधूत कुलकर्णी,हर्षल गायकवाड ,साई लहाने,नम्रता लहाने,कृष्णा कामाजी सोनवणे,वैभव कामाजी सोनवणे,सान्वी रामकिशन डोळस,ओजस्वी सुहास चव्हाण,अदिती अतुल वेताळ,स्मिरल रवींद्र कंदले,समीक्षा राजू लहिरे,तनुजा अरुण चव्हाण,तनु गणेश चव्हाण ,ऋतुजा दिपक मगर,वैष्णवी महाबली मिसाळ ,गौरव जगन्नाथ गागरे,आदित्य माधवी आत्मलिंग,तनुजा प्रमोद शेवाळे,प्रांजली विरकर,धनश्री हर्षल घोडके,समृद्धी राजेंद्र थोरात,वैभवी गोविंद इंगळे,शिवानी सचिन गवळी,साक्षी संतोष शेकडे,भक्ती सुखदेव पवार,वैभवी सुरेश पवार,अमीन रियाज शेख,अविनाश काकासाहेब कोळेकर,अनुजा प्रमोद शेवाळे,मृणाल राजेंद्र देसाई आदी राज्यभरातील निवडक साठ बालकवी सहभागी होणार आहेत.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख,प्रकल्प प्रमुख देविदास बुधवंत,आनंदा साळवे,महाबली मिसाळ,स्मिता गायकवाड,प्रांजल वीरकर आदी परिश्रम घेत आहेत.