जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार आबनराव पारवे यांना प्रदान
परभणी, प्रतिनिधी – मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेला उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार पूर्णा तालुक्यातून आबनराव पारवे फुकटगाव येथिल प्राथमिक शिक्षक यांना जाहिर झाला. या पुरस्काराचे वितरण दिनांक-09 सप्टेंबर रोजी झाले.
परभणीतील भाग्यलक्ष्मी लॉन्स मध्ये उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक जिल्हाधिकारी आंचल गोयल, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मार्गदर्शक कोल्हापूर येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर नाईक, तर सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य वित्त व लेखाधिकारी सचिन कवठे, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, हवामान अभ्यासक पंजाब डख, कृषिभूषण कांतराव देशमुख झरीकर, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सभापती अनिल नखाते, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्यासह सर्व उपशिक्षणाधिकारी, सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आबनराव पारवे यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक, सामाजिक कार्याबद्दल त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाने या वर्षीचा उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार दिला.हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व सर्वत्र स्वागत,सत्कार होत आहे. एका उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकाला हा सन्मान मिळाल्यामुळे जनसामान्यातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.