श्री.भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सेलूमध्ये भव्य पारंपारिक शोभायात्रेचे आयोजन
सेलू / प्रतिनिधी – श्री.भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त सेलू येथील श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मंगळवार दि.29 एप्रिल 2025 रोजी दुपारी 04:30 वाजता भव्य पारंपारिक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने श्री गायत्री माता मंदिर,परभणी रोड येथे मंगळवारी सकाळी 07 वाजता श्री भगवान परशुराम मुर्तिला महाअभिषेक सायंकाळी 09 वाजता श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरात महाआरती होणार आहे. पारंपारिक शोभायात्रेमध्ये प्रमुख आकर्षण श्री भगवान परशुराम यांची 8 फुट भव्य मूर्ती, श्री.रेणुकामाता माहुरगड देवीचा भव्य 8 फुट मुखवटा,श्री भगवान परशुराम यांची पालखी,सजीव देखावे,ढोल ताशा पथक,महिला मंडळ, महिला टाळपथक,कलशधारी महिला,लेझीम पथक, मुलींचे मर्दानी खेळ,म्युझिकल व्हॅन,भव्य अतिशबाजी,डी.जे विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने जयत तयारी करण्यात आली आहे. शहरातील मुख्य रस्त्याने पारंपारिक शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी शोभायात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. शोभायात्रा व विविध कार्यक्रमांमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.