सेलू येथे कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन; मर्दानी खेळाला मिळणार नवसंजीवनी
सेलू / नारायण पाटील – पारंपरिक मर्दानी खेळ असलेल्या कुस्तीला पुन्हा संजीवनी देण्यासाठी आज सेलू येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. गेल्या काही वर्षांत कुस्तीचा पारंपरिक आखाडा बंद झाल्याने स्थानिक कुस्तीप्रेमींमध्ये अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर पैलवान सतीश विठ्ठलराव आकात यांनी कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
भूमिपूजन समारंभ:
या कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन पै. परमेश्वर आकात, पै. विठ्ठल भैय्या ठाकूर, पै. विठ्ठलराव आकात, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर दादा सुरवसे, नूतन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक नागेश नाना कान्हेकर, नूतन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश माळवे सर, सतीश नावाडे सर, माजी पोलीस उपनिरीक्षक विष्णू जाधव, परभणी पोलीस गणेश पावडे, करसखेडा पुनर्वसनचे माजी सरपंच भाऊसाहेब झोल आणि सुनील झोल यांच्या हस्ते करण्यात आले.
युवा नेते साईराज बोराडे, प्रशांत सिंह ठाकुर, विजय आकात, दिलीप मगर, परमेश्वर कादे, रमेश मगर, पुरुषोत्तम आकात, अमर सुरवसे, अक्षय आकात, वैभव कदम, गणेश काचेवार, प्रसाद काचेवार, सुरेश पौळ, संजय पवार, बजरंग पवार, सुमित कटारे, उमेश शिरसागर, इंद्रजीत गलांडे, सचिन कदम आणि यश आकात या कुस्तीप्रेमींचीही विशेष उपस्थिती होती.
सेलू तालुक्यात कुस्तीला ऐतिहासिक महत्त्व आहे. के. बाबासाहेब महाराज यात्रा दरम्यान होणाऱ्या कुस्तीच्या आखाड्याचा उपक्रम मागील काही वर्षांत जवळपास बंद झाला होता. या घटनेमुळे स्थानिक खेळाडू व कुस्तीप्रेमींच्या मनात खंत निर्माण झाली होती. या प्रशिक्षण केंद्रामुळे कुस्तीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नवीन पिढीतील खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळेल आणि ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास पैलवान सतीश विठ्ठलराव आकात यांनी व्यक्त केला.
“ही तालीम केवळ एक केंद्र नसून कुस्तीच्या गौरवशाली परंपरेला जपणारा आणि पुढे नेणारा प्रकल्प आहे. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होऊन त्याला यशस्वी करावे,” असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले