आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन
प्रतिनिधी:-
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्याकरिता मी कायम प्रयत्नशील असतो. ग्रामीण रस्त्यांची दुरावस्था दूर करण्यासाठी मी सरकारकडे मागणी केलेल्या कामांचा मी सातत्याने पाठपुरावा करून कामे मंजूर करून आणतो. ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारावा म्हणून त्यांच्या विकास कामांना निधी मिळावा यासाठी सतत प्रयत्न करत असतो. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत दामपुरी फाटा ते दामपुरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गंगाखेड विधानसभेचे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गंगाखेड तालुक्यातील दामपूरी फाटा ते दामपुरी या २.२ किमी रस्त्याच्या विकास कामाला १.३६ कोटी रुपये मंजूर करण्यात आला आहे. तसेच मौजे घटांग्रा ता.गंगाखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रजिमा २९ ते घटांग्रा रस्ता रस्त्याच्या विकास कामाचे आणि २५-१५ विकास निधिअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आ.डॉ. रत्नाकर यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा आणि नागरी प्रश्न मार्गी लागले पाहिजे, यासाठी सतत पाठपुरावा करत असून. विकासाची घौडदौड कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असेल, असे मत आ.गुट्टे यांनी याप्रसंगी बोलताना मत व्यक्त केले.
मौजे दामपुरी येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त वनअधिकारी दिनकरजी नागरगोजे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा राणीसावरगावचे सरपंच माऊली जाधव, तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, सय्यद अल्ताफ, युवा तालुकाध्यक्ष बालाजी लटपटे, सरपंच सर्जेराव अटके, माजी सरपंच भरत नागरगोजे, तालुका उपाध्यक्ष गोविंद डोणे, माजी सरपंच माधवराव हाके, राहुल बानाटे, पंढरी राठोड, संदीप रायभोले, गोविंदराव चव्हाण, रामराव नागरगोजे, शिवदास माने, उपसरपंच सर्जेराव माने, नितीनराव मुंडे, माजी सैनिक माधवराव नागरगोजे, उपअभियंता श्री बाचेवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घटांग्रा येथील जागृत देवस्थान रामलिंगेश्वर मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच सखारामजी इमडे होते.तसेच कृ.उ.बाजार समितीचे संचालक माऊली जाधव, तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, सय्यद अल्ताफ शेठ, युवा तालुकाध्यक्ष बालासाहेब लटपटे, रासपा तालुकाध्यक्ष शेषेराव सलगर, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल बानाटे, तालुका उपाध्यक्ष गोविंद डोणे, उपअभियंता श्री बाचेवार, सरपंच गोविंद सानप, घटांग्राचे सरपंच खंडुजी मिरगेवाड, माणिकराव बडवणे, अभियंता नितीन मुंडे, जयराम जाधव, पंढरीनाथ राठोड, उपसरपंच ज्ञानोबा इमडे, गुत्तेदार श्री जैन यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.