मोठी बातमी.. खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय
वातावरणात होणारे बदल तसेच दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता शेती करणे अवघड झाले आहे. अशातच आता रासायनिक खतांच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे खतांच्या दरात वाढ झाली आहे. संयुक्त खतांच्या 50 किलोच्या पिशवीमागे 240 ते 255 रुपयांच्या किंमती वाढण्यात आल्या आहेत. 1 जानेवारीपासून कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्या
प्रामुख्याने डीएपी आणि संयुक्त खते तयार करण्यासाठी लागणारे फॉसफेट रॉक, अमोनिया, फॉस्फेरीक अॅसिड, नायट्रोजन, झिंक, सल्फर या घटकांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. या सर्व घटकांची परदेशातून मागणी करावी लागते. परंतु जगातीक बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत. याचा फटका आता शेतकरी वर्गाला बसला असून सरकारने खतांवरील अनुदान वाढवावे अशी मागणी होत आहे.
खतांचा भाव का वाढला जातोय?
शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा अशी मागणी केली जाते. तर दुसरीकडे वर्षाला खतांच्या किमतीमध्ये वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
शेणखताचे दर वाढले
शेणखताचा शेतात वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे शेणखत खरेदीला शेतकऱ्यांची जास्त मागणी आहे. त्यामुळे किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.