वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी बातमी… एमबीबीएसच्या जागा वाढणार

0 0

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मेडिकलच्या सिट वाढण्यासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे मेडिकलचे शिक्षण घेऊन डॉक्टर बनणाऱ्यांचे स्वप्न साकार होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या दहा हजार नवीन जागा साल २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात वाढविण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केलेली आहे. येत्या पाच वर्षांत मेडिकलच्या नवीन जागांची संख्या वाढून ७५ हजार करण्याची घोषणा सरकारने केली आहे. सरकारच्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्सची संख्या वाढून नागरिकांचा योग्य वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे.

देशभरातील एमबीबीएस डॉक्टर

देशभरातील MBBS डॉक्टर बनण्यासाठी १२ ते १३ लाख स्टुडन्टस नीट युजीची परीक्षा दिली जाते. यात केवळ ५६ हजार स्टुडन्टस सरकारी मेडिकल कॉलेजचे असतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी कॉलेजात प्रवेश करावा लागतो. बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी कॉलेजात प्रवेश घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांना मोठी कॅपिटेशन फी भरुन प्रवेश घ्यावे लागतात. अशा विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्प- २०२५ मध्ये दहा हजार नवीन जागा वाढविल्या आहेत. सरकार पुढील पाच वर्षात या वैद्यकीय जागांची संख्या ७५ हजार करणार आहे.

अर्थसंकल्प -२०२५ च्या अर्थसंकल्पातील भाषणात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दहा हजार नवीन जागांची घोषणा केली आहे. सरकाने आरोग्य क्षेत्राला चांगल्या सुविधा देण्यासाठी टीयर-२ शहरात आरोग्यांच्या सुविधा वाढविण्यासाठी एमबीबीएसच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दहा वर्षांत वैद्यकीय महाविद्यालये आणि मेडिकलच्या जागा वेगाने वाढत आहेत. यंदा केंद्र सरकारचे  १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी सांगितले की केंद्र सरकारने २०२३-२४ मध्ये ६० नवीन मेडिकल कॉलेज सुरु करण्यास मंजूरी दिलेली आहे. याच बरोबर एकूण ७६६ मेडिकल कॉलेज देशात सध्या सुरु आहेत. वैद्यकीय कॉलेजात ८.०७ टक्के वाढ झाली आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षात मेडिकल कॉलेज आणि जागांमध्ये दुप्पटवाढ झाली आहे.

error: Content is protected !!