राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा परभणीत भाजपाचा आनंदोत्सव

0 34

परभणी,दि 11 ः
भाजपाच्या उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत यश आल्याबद्दल परभणी शहरातील मुख्य बाजारपेठेत भाजपाच्या वतीने शनिवार 11 जून रोजी ढोल ताशाच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
कुशल राजकीय रणनितीकार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी नेतृत्वात महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल,माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे व धनंजय महाडिक निवडून आल्याबद्दल परभणी मुख्य बाजारपेठेत भाजपाच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी,संघटन सरचिटणीस अँड.एन.डी.देशमुख,सरचिटणीस दिनेश नरवाडकर,माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल,उपाध्यक्ष मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे,विजय गायकवाड,संजय कुलकर्णी,मंडळाध्यक्ष सुनिल देशमुख,रितेश जैन,विजय दराडे,चिटणीस विलास चांदवडकर,अँड.गणेश जाधव,संतोष जाधव,संजय शामर्थी,वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज पोरवाल,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके,सांस्कृतिक आघाडी संयोजिका सौ.विजया कातकडे,सौ.पुनम शर्मा,आत्मनिर्भर भारत योजना संयोजक गणेश देशमुख, आध्यात्मिक आघाडी संयोजक संजय जोशी,युवा मोर्चा ग्रामीण सरचिटणीस शिवाजी शेळके,युवा मोर्चा मंडळाध्यक्ष निरज बुचाले,दिपक शिंदे आदी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती

error: Content is protected !!