ब्रेकिंग – ‘या’ १८ जिल्ह्यांत होणार अनलॉक

0 2,552

मुंबई – राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यामध्ये ५ टप्प्यांनुसार राज्यात अनलॉक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

pune lok1

वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी लॉकडाऊन हटवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्ण क्षमतेने व्यवहार सुरू राहणार आहे. चित्रपटगृह, कार्यालये, शूटिंग, जीम, सलून पहिल्या टप्प्यात सुरू राहणार आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पहिला टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे. या पहिल्या टप्प्यात एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद, भंडारा,बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे आहे. येथे लॉकडाऊन हटवण्यात येणार आहेत.

दुसरा टप्पा – ५ टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता २५ ते ४० टक्के असायला पाहिजे. या टप्प्यात ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदूरबार. या टप्प्यामध्ये काही निर्बंध अंशतः शिथिल करण्यात येतील.

तिसरा टप्पा – ५ ते १० टक्के पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा जास्त असायला पाहिजे. या तिसऱ्या टप्प्यात १० जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधूदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद.

चौथा टप्पा – १० ते २० दरम्यान पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. यामध्ये २ जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे, रायगड.

पाचवा टप्पा – २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची क्षमता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाहिजे. १० जिल्हे पाचव्या टप्प्या असणार आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

error: Content is protected !!