महायुती सरकारची विकास कामे आणि योजना घराघरात पोहोचवा-आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

0 7

 

गंगाखेड (प्रतिनिधी):-
राज्यातल्या माहिती सरकारने सर्वसामान्य लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून अनेक विकास कामे केली आहेत. विविध समाज घटकांचा विचार करून तसे योजना आणि निर्णय घेतले आहेत. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतुदी करून महाराष्ट्राच्या सार्वंगिण विकासाला चालना दिली आहे. त्यामुळे येत्या काळात महायुती सरकारची सर्व विकासकामे घोषणा निर्णय गावोगावी आणि लोकांच्या घरोघरी पोहोचवा, असे आवाहन गंगाखेडची रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे.

तालुक्यातील मौजे.बनपिपळा येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित मित्र मंडळ प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उक्कडगाव येथील विविध विकास सोसायटीचे चेअरमन बबनराव शिवाजी शिंदे यांच्यासह अनेकांनी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.

पुढे आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, सामाजिक सक्षमीकरणाचा विचार करून महायुती सरकारने महत्त्वकांक्षी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, वयोश्री योजना, मोफत वीज व सिलेंडर पुरवठा तसेच अन्य अनेक योजनांमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. त्यामुळे ते अपप्रचार करत आहेत. म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. जेणेकरून आगामी विधानसभेत महायुतीचाच विजय होईल.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण व शहरी भागात जनसंघटन आणि जनहिताची कामे करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या मित्र मंडळाचे सर्वांना कौतुक आहे. त्याचा विस्तार दिवसेंदिवस विस्तार वाढतो आहे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार गुट्टे यांनी या भागाचा कायापालट केला आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे मित्रमंडळात प्रवेश केला आहे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.

तर बबनराव शिंदे हे सामाजिक बांधिलकी जोपासून काम करणारे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी प्रामाणिकपणे काम करून विविध विकास सोसायटीमध्ये आपले स्थान बळकट केले आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यांचा मित्र मंडळात प्रवेश झाल्यामुळे आगामी काळात निश्चित फायदा होईल, असा विश्वास तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी व्यक्त केला.

अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक विठ्ठल सातपुते यांनी केले. तर आभार प्रभाकर सातपुते यांनी मानले. यावेळी तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, सभापती गजानन रोकडे, विनोदराव किरडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!