एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कुलमध्ये आषाढी एकादशी सोहळा साजरा

0 681

सेलू ( नारायण पाटील )
येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल व कॉलेजमध्ये आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
शाळेत आज आषाढी एकादशीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. , महाराष्ट्रातील संत विठ्ठल तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ, मृदंग, चिपळ्या सहित पंढरपूर वारीचे साक्षात दर्शन करून दिले. या सुगम संगीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे अभंग याचे गायन केले.तसेच संगीत शिक्षक विलास शेरे यांनी माझे माहेर पंढरी हा अभंग सादर करून मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. अध्यक्षीय भाषणात डॉ.सरांनी आषाढी वारी बद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.आषाढी एकादशीला दिंडी यात्रा निघते. महाराष्ट्र हे अनेक थोर संतांचे कार्य स्थान आहे. या संतांच्या जन्म किंवा समाधी स्थळावरून या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरला जाण्यासाठी लांबचा प्रवास करतात. दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना वारकरी म्हणतात.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री मिलिंद खंदारे, श्री विलास शेरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वंदना खरावणे, संचालन अश्विनी हिबारे यांनी केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!