सेलूत ज्ञानेश्वरी प्रवचन कार्यक्रमात माऊलींचा जन्मोत्सव साजरा

0 47

 

सेलू,दि 19 ः
शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब संस्थान व ज्ञानेश्वरी आराधना मंडळ,सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र श्रावण निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन कार्यक्रमात काळ रात्री ज्ञानेश्वर माऊलीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
२९ जुलै ते १७ औगस्ट या कालावधीत या ज्ञानेश्वरी वरील प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब मंदिर मध्ये करण्यात आले आहे . दरम्यान दि १८ औगस्ट रोजी माजलगाव येथील ह भ प लक्ष्मीप्रसाद पटवारी यांची प्रवचन सेवा होती .
या प्रवचन सेवेत त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या जन्माची कथा सांगितली . भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला उपदेश करीत श्रीमद भगवत गीता सांगून संपूर्ण प्राणीमात्रांना जगण्याचा मार्ग दाखवला .परंतु ही गीता संस्कृत भाषेत असल्यामुळे सर्वसामान्यांना समजत नव्हती .म्हणून ती सर्व सामान्यांना समजावी यासाठी भगवंताने ज्ञानेश्वर माऊलीच्या रुपात जन्म घेऊन दिशादर्शक असणारा ज्ञानेश्वरी हा ग्रँथ मराठी भाषेत लिहिला .असेही पटवारी यांनी स्पष्ट केले .संतांच्या चिंतनाशिवाय व कथेशिवाय माणसाला गत्यांतरच नाही .कारण मोक्षपदाला जाणारा हाच एकमेव मार्ग आहे . विश्वकल्याणसाठीच संतांचे अवतार होत असतात व लोकांना प्रेमाने बोलून व हाताला धरून त्यांचे लक्ष परमार्थात वृद्धिंगत करण्यासाठीच माऊलीचा जन्म झाला .असेही यावेळी प्रवचनात पटवारी महाराज यांनी स्पष्ट केले .
प्रवचन सेवेनंतर ह भ प वसंत महाराज मंडलिक व संस्थानचे पुजारी सुधीर मंडलिक यांच्या हस्ते माऊलीच्या प्रतिमेचे पूजन सामूहिक आरती करण्यात आली .शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ.निखील केंद्रेकर

error: Content is protected !!