परभणीसह विविध गावात साखळी उपोषण

0 35

 

 

परभणी/प्रतिनिधी – मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून शुक्रवार (दि.27)पासून परभणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मैदानात बेमुदत साखळी उपोषणाला मराठा समाजाच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. रवीवारी आंदोलनाच्या (दि.२९) तिसऱ्या दिवशी या उपोषणात परभणी तालुक्यातील बलसा गावातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देवून काहीवेळ आंदोलनात आपला सहभाग नोंदवला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी मराठा बांधवांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली. तसेच मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशा भावना व्यक्त केल्या.

पोखर्णी साळापुरी येथे उपोषण
परभणी तालुक्यातील पोखर्णी नृसिंह येथे साखळी उपोषण करण्यात येत आहे यामध्ये सर्कल मधील विविध गावांनी सहभाग घेतला आहे. तसेच साळापुरी येथे देखील सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे.

error: Content is protected !!