परभणीसह ‘या’ जिल्ह्यात 17 मार्चला गारपीटीची शक्यता

0 44

परभणी,दि 15
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक १७ मार्च रोजी  परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.असी माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे.

दिनांक १५,१६,१७ मार्च : रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात तर दिनांक १८ मार्च : रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात
तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक १५ मार्च : छत्रपती संभाजी नगर, जालना जिल्ह्यात.
दिनांक १६ मार्च : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात.
दिनांक १७ मार्च : परभणी व हिंगोली जिल्ह्यात.
तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!