चारित्र्य आणि शिस्त ही टक्केवारीत मोजता येत नाही-प्राचार्य डॉ. विकास सलगर
पूर्णा,दि 21 ः
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात इयत्ता पहिली ते बारावी वर्गांना शिकवणाऱ्या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा दिनांक 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी या पाच दिवसीय कालावधीत पूर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशालेत संपन्न होत आहे. दरम्यान प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट परभणी प्राचार्य डॉ.विकास सलगर, अधिव्याख्याता राम नाईकनवरे यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी बोलताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणीचे प्राचार्य डॉ विकास सलगर म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या नव्या बदलांना स्वीकारून अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांनी सज्ज व्हावे. बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्नशील राहावे. चारित्र्य आणि शिस्त या दोन गोष्टी अशा आहेत की त्या टक्केवारीत मोजता येत नाहीत .त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावे. प्रशिक्षण यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव टिमके , योगेश देशमुख प्रशिक्षण प्रमुख श्री रवींद्र हनुमंते यांनी जबाबदारी सांभाळली तर सुलभक म्हणून व्यंकट रमण जाधव, अनिल ढाले, डॉ .अमोल देशपांडे, डॉ. संतोष सेलुकर, संतोष रत्नपारखे, आनंद जाधव, मारुती कदम, राजू पांचाळ, विलास बोकारे, कातकडे श्रीमती सारिका गिरी, प्रतिमा मसारे, राधा भिसे, डॉलेश्वरी
डिब्बे, आदींनी काम पाहिले.