मंगरूळ बुद्रुक येथील सावकाराच्या घरी सहकार विभागाची धाड

0 2

मानवत /प्रतिनिधी
मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील अवैद्य सावकारी  करणारे यासीनखान सज्जनखान पठाण यांचे दोन राहते घरी दि.4 सप्टेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व सावकाराचे जिल्हा निबंधक यांच्या कार्यालयात तक्रार प्राप्त नुसार. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गायकवाड गावडे व जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र परदेशी व संजय भालेराव मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनानुसार. मानवत सावकाराचे निबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एम बी धुमाळ. शेख उस्मान के जी निकम. पी जी बाहेकर. एस एम कनसटवाड. एस एन पुजारी.बी एस कुरुडे. व्ही जी देखणे .सुनिता गोरे .पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र कांबळे.
पी ए वाघ जमादार. तिजोरे व मोरे या समूहाने मानवत तालुक्यातील मंगरूळ बुद्रुक येथील अवैध सावकारी व्यवसाय करणारे यासीन खान सज्जन खान पठाण यांचे दोन राहते घरी दिनांक 4 सप्टेंबर रोजी धाड टाकण्यात आली. टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये झाडाझडती अवैध स्वरूपाचे कागदपत्रे आढळून आली कागदपत्राची तपासणी चालू आहे. टाकलेल्या धाडीमध्ये अवैध स्वरूपाची कागदपत्र आढळल्यास पुढील कारवाईसाठी सावकाराचे निबंधक परभणी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. यामध्ये गैरअर्जदार यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून. आरोप सिद्ध झाल्यास सावकारी नियमन अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असे सावकाराचे निबंधक मानवत कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एम बी धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळवले आहे.

error: Content is protected !!